“मला अभिनेत्री कंगना रणौतची खूप आठवण येते, पण आता ती फक्त एक जोक आहे”
माजी चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांच्या मते, कंगना रणौत रस्ता भरकटली आहे. राजकारणात प्रवेश केल्यावर तिच्यातील अभिनेत्री हरवली असून ती आता फक्त एक 'जोक' बनली आहे. कंगनाने बॉलीवूडवर केलेले आरोप फेटाळून लावत, राजीव यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं. त्यांनी कंगनाची तुलना आलिया भट्टशी करत, दोघांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हटलं.