सैफ-सोहा अभिनयात व्यग्र, सबा सांभाळतेय पतौडी कुटुंबाचा तब्बल १००० कोटींचा वारसा
शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांना सैफ, सोहा आणि सबा अशी तीन अपत्ये आहेत. सैफ आणि सोहा फिल्म इंडस्ट्रीत आहेत, तर सबा प्रसिद्धीपासून दूर राहते. सबा भोपाळच्या १००० कोटी रुपयांच्या वारशाची जबाबदारी सांभाळते. 'औकाफ-ए-शाही' ट्रस्टची 'मुतवल्ली' म्हणून ती काम पाहते. तिच्या वडिलांनी तिला या जबाबदाऱ्या शिकवल्या. सबा महिलांसाठी शाळा आणि रुग्णालय सुरू करण्याची योजना आखत आहे.