“नाहीतर त्याला पाठवेन…”, सलमान खानची तुकाराम मुंढेंचे नाव न घेता पोस्ट, कोणाला दिला इशारा?
अभिनेता सलमान खानने आपल्या मैत्रिणीच्या ‘द टक शॉप अॅट सॅव्हिओज’ कॅफेचा व्हिडीओ शेअर करत गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत सल्ला दिला. त्याने तुकाराम मुंढेंचा अप्रत्यक्ष उल्लेख करत स्वच्छता न राखल्यास त्यांना पाठवण्याची धमकी दिली. तुकाराम मुंढे सध्या एफडीए आयुक्त म्हणून हॉटेल्सवर कारवाई करत आहेत. सलमान लवकरच ‘बिग बॉस २०’ आणि ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ चित्रपटात दिसणार आहे.