सकाळी घटस्फोट अन् संध्याकाळी पहिल्या चित्रपटाचा प्रिमियर; बॉलीवूड अभिनेता म्हणाला…
अभिनेता समीर सोनी आणि अभिनेत्री नीलम कोठारी यांनी आधीच्या घटस्फोटांनंतर पुन्हा प्रेमात पडून संसार थाटला. समीरचं पहिलं लग्न राजलक्ष्मी खानविलकरशी झालं होतं, तर नीलमचं ऋषी सेठियाशी. दोघांनाही घटस्फोटानंतर कठीण काळाचा सामना करावा लागला. नीलमला तिच्या मित्रांनी आधार दिला. एकता कपूरमुळे समीर आणि नीलमची भेट झाली. २०११ साली त्यांनी लग्न केलं आणि २०१३ मध्ये अहाना नावाची मुलगी दत्तक घेतली.