“भारतात शांतता नाही” वक्तव्यावर संजय दत्तचं स्पष्टीकरण; म्हणाला, “मी जे बोललो ते…”
बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने 'शेखर टुनाइट' कार्यक्रमात भारतातील शांततेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ झाला. त्याने स्पष्ट केलं की, त्याचं विधान स्क्रिप्टेड होतं आणि त्याचा उद्देश हलका-फुलका विनोद करणं हा होता. त्याने कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नसल्याचं सांगितलं. संजय दत्तने पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर आणि ट्रम्प यांच्या धोरणांवरही उपरोधिक टिप्पणी केली होती.