“तुझी जागा तुरुंगात, तोंड कधी उघडावं ते…”; अभिनेता राजपाल यादववर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादवला चेक बाऊन्सप्रकरणी फटकारलं आहे. २ कोटी रुपये जमा न केल्याबद्दल न्यायालयाने त्याला कडक शब्दांत सुनावलं. १५ सप्टेंबर रोजी ५ कोटींपैकी २ कोटी रुपये जमा करण्याची शेवटची संधी दिली होती, पण त्याने पालन केलं नाही. न्यायालयाने त्याला ६ ऑक्टोबरपर्यंत रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी होईल.