“माझं उदात्तीकरण…”; ‘प्रहार’साठी उज्ज्वल निकम यांनी कोणत्या अटी ठेवल्या होत्या?
राजकुमार रावचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘प्रहार - द उज्ज्वल निकम स्टोरी’ १६ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील अजमल कसाबच्या खटल्यातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित आहे. निकम यांनी चित्रपटात कोणत्याही पात्राचे उदात्तीकरण न करण्याची अट ठेवली होती. राजकुमार रावने निकम यांची भूमिका साकारण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे निकम यांनी कौतुक केले.