अचानक ‘संपर्क करू नका’ म्हणत झाली गायब; ही बॉलीवूड अभिनेत्री कुठे गेली? गूढ कायम
८० च्या दशकातील 'वीराना' चित्रपटातील अभिनेत्री जास्मिन धुन्ना गेल्या चार दशकांपासून गायब आहे. तिने १९७९ मध्ये 'सरकारी मेहमान' चित्रपटातून पदार्पण केले, पण 'वीराना'च्या यशानंतर तिने अभिनय सोडला. काहींनी तिच्या गायब होण्याचे कारण अंडरवर्ल्डच्या धमक्यांशी जोडले, तर काहींनी ती अमेरिकेत असल्याचे म्हटले. तिच्या ठिकाणाबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती नाही.