कतरिना कैफने बाप्पाच्या चरणी डोकं टेकवलं अन्…, ‘त्या’ गोष्टीने वेधले लक्ष, पाहा व्हिडीओ
बॉलीवूडचे लाडके जोडपे विकी कौशल आणि कतरिना कैफ अलीकडेच अंबानींच्या 'अँटिलिया' निवासस्थानी गणेशोत्सवात सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषेत बाप्पाच्या चरणी नतमस्तक झालेल्या या जोडीचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. विकीने नक्षीकाम असलेला कुर्ता घातला होता, तर कतरिना ऑलिव्ह ग्रीन अनारकली ड्रेसमध्ये दिसली. त्यांच्या लूकची आणि कतरिनाच्या केसांची खूप चर्चा होत आहे.