“मी माझ्या दुसऱ्या बंगल्यात रेखाबरोबर राहायला गेलो…”, अमिताभ बच्चन काय म्हणाले होते?
महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर अमिताभ यांनी एकदा प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी पुरावे मागितले होते आणि माध्यमांनी कोणताही ठोस पुरावा सादर केल्याशिवाय गप्प राहणं पसंत असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी रेखाबरोबरच्या अफवांवर स्पष्टीकरण देणं अपमानास्पद असल्याचं म्हटलं होतं. अमिताभ आणि रेखा यांनी १९७०-८० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट एकत्र केले होते.