…म्हणून ‘धुरंधर’ नाही, तर ‘गोंधळ’ला निवडलं! ज्युरींनी सांगितलं कारण
यंदा भारताने ऑस्करच्या शर्यतीत 'गोंधळ' हा मराठी चित्रपट पाठवला आहे. संतोष डावखर दिग्दर्शित या चित्रपटाने ३० पेक्षा जास्त हिंदी व प्रादेशिक चित्रपटांना मागे टाकले. 'धुरंधर'ला केवळ ४ मते मिळाल्याने त्याची निवड झाली नाही. 'गोंधळ' महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेवर आधारित असून, याला इलैयाराजा यांनी संगीत दिलंय. 'गोंधळ'ची निवड मराठी चित्रपटासाठी अभिमानास्पद आहे.