“मी येईन, पण…”, पाकिस्तानला यायचं आमंत्रण देणाऱ्याला काय म्हणाले होते दिवंगत इरफान खान?
भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत केलेल्या प्रत्युत्तर कारवाईनंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. पाकिस्तानी पत्रकाराने इरफानला पाकिस्तानात येण्याचे आमंत्रण दिल्यावर इरफानने "मी येईन, पण मी परत येऊ शकेन का?" असे उत्तर दिले होते. या उत्तराने सर्वजण हसू लागले.