‘जाट’मुळे सनी देओलसह कलाकार अन् निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
अभिनेता सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाविरोधात जालंधरमध्ये ख्रिश्चन समुदायाने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली आहे. चित्रपटातील एका दृश्यात रणदीप हुडा चर्चमध्ये येशू ख्रिस्तासारखा उभा राहतो, ज्यामुळे समुदायाने नाराजी व्यक्त केली आहे. सनी देओल, रणदीप हुडा, विनीत कुमार सिंह, दिग्दर्शक गोपीचंद आणि निर्माता नवीन मालिनेनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.