“मी खोलीच्या कोपऱ्यात साप…”, जॅकी श्रॉफ यांनी दिला चाळीतील आठवणींना उजाळा
जॅकी श्रॉफ हे हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत, पण त्यांना हे यश सहज मिळालं नाही. त्यांनी शेंगदाणे विकण्यापासून ते चित्रपटाची तिकिटं विकण्याचं काम केलं. मुंबईच्या तीन बत्ती चाळीत राहणाऱ्या जॅकी यांनी चाळीतील शौचालयाच्या रांगेत उभं राहण्याच्या आठवणींना उजाळा दिला. संघर्षानंतर 'हिरो' चित्रपटातून त्यांना यश मिळालं. त्यांचे 'तेरी मेहेरबानिया', 'कर्मा', 'राम लखन' यांसारखे चित्रपट खूप गाजले.