“रेखामुळेच…”, जया बच्चन यांनी ‘सिलसिला’मध्ये काम करण्याआधी ठेवलेली अट
१९८१ मध्ये यश चोप्रा यांनी ‘सिलसिला’ चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अमिताभ बच्चन यांच्यासोबत परवीन बाबी आणि स्मिता पाटील यांची निवड केली होती. मात्र, नंतर रेखा आणि जया बच्चन यांची निवड झाली. जया बच्चन या चित्रपटात काम करण्यास अस्वस्थ होत्या, परंतु संजीव कुमार यांच्या मध्यस्थीमुळे त्या तयार झाल्या. जया यांनी सेटवर कायम उपस्थित राहण्याची अट ठेवली होती.