“तुम्ही मृत्यू विकताय”, गुटख्याच्या जाहिराती करणाऱ्या अभिनेत्यांवर जॉन अब्राहमची टीका
बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने पान मसाला व गुटख्यांच्या जाहिराती करणाऱ्या कलाकारांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने अशा जाहिराती करून हे कलाकार मृत्यू विकत असल्याचं म्हटलं आहे. तो कधीच अशा जाहिराती करणार नाही, असं त्याने स्पष्ट केलं आहे. तसेच पान मसाला उद्योगाची वार्षिक उलाढाल ४५ हजार कोटी रुपये आहे, असंही त्याने नमूद केलं.