“छोट्याशा खोलीत राहतात पण…”, अभिनेत्रीने केली बॉलीवूड स्टार्सची पोलखोल
बॉलीवूड अभिनेत्री कल्की कोचलिनने एका मुलाखतीत बॉलीवूडमधील प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य केले. तिने सांगितले की, काही कलाकार लहान १ बीएचके फ्लॅटमध्ये राहतात पण महागड्या गाड्यांमध्ये फिरतात. कल्कीने तिच्या अनुभवांबद्दल सांगितले की, ती स्विफ्ट कारने फिल्मफेअर पुरस्कारासाठी जायची. तिला तिचे आयुष्य तिच्या अटींवर जगायचे आहे. काही कलाकारांसाठी पीआर आणि बॉडीगार्ड्स आवश्यक असतात, असेही तिने नमूद केले.