२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आलं नाव, तब्बल २५ वर्षांनी मुंबईत परतली मराठमोळी अभिनेत्री
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल २५ वर्षांनी मुंबईत परतली आहे. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. २००० साली देश सोडलेल्या ममताने २०१५ मध्ये ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने करिअरवर परिणाम झाला होता. अलीकडेच तिला क्लीन चिट मिळाल्यानंतर ती मुंबईत परतली आहे. ममताने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.