“सलमान खान वाईट अभिनेता”, करीना कपूरने भाईजानबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेली…
अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सलमान खान यांनी 'मिस्टर अँड मिसेस खन्ना', 'क्योंकी', 'बाजरंगी भाईजान' आणि 'बॉडीगार्ड' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तरी करीना सलमानची चाहती नाही. याबद्दल तिने स्वत: "मी सलमानची अजिबात चाहती नाही. मला तो आवडत नाही, तो खूप वाईट अभिनेता आहे" असं म्हटलं होतं. दरम्यान, करीना शाहरुख खानची मोठी चाहती आहे आणि तिला आमिर खानही आवडतो. ती शेवटची 'सिंघम अगेन' चित्रपटात दिसली होती.