पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे (पश्चिम) येथील घरात दरोडेखोराने हल्ला केला. या हल्ल्यात सैफला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफची पत्नी करीना कपूर खानने या घटनेवर प्रतिक्रिया देत, सैफवर उपचार सुरू असल्याचे आणि कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित असल्याचे सांगितले. त्यांनी मीडिया आणि चाहत्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.