“उद्धट अन् स्वार्थी…”, सुनीता आहुजा यांना पाठिंबा देत कश्मीरा शाह म्हणाली, “इतक्या खासगी…”
इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत कश्मीरा शाहने लिहिले, "कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकाऱ्याला एखाद्याच्या आयुष्यातील इतक्या सगळ्या खासगी गोष्टी माहीत असणं, त्यातून असं नातं निर्माण व्हावं, असं मी कधीच ऐकलं नाही. मला माहीत आहे की, मी एक खंबीर स्त्री आहे आणि मी अशा कुटुंबात लग्न करून आले आहे, जिथे स्त्रिया खंबीर आहेत. आम्ही आमच्या कुटुंबाची काळजी घेतो म्हणून आम्हाला अनेकदा उद्धट, त्रासदायक, वर्चस्व गाजवणाऱ्या, फक्त स्वतःच्या ध्येयावर लक्ष देणाऱ्या किंवा स्वार्थी म्हटले जाते; पण आम्हाला 'खुनी' म्हणण्याची ही पहिलीच वेळ आहे."