किर्ती सुरेश घरचं जेवण खाऊन राहते अगदी फिट, आहारात असतात फक्त ‘हे’ पदार्थ; जाणून घ्या…
किर्ती सुरेशने तिच्या फिटनेस आणि डाएटबद्दल सांगितले की, ती लहानपणापासून सडपातळ होती आणि फारसा व्यायाम करत नव्हती. ती फक्त घरचे, पारंपरिक दक्षिण भारतीय जेवण खाते. तिचा आहार हाय-प्रोटीन आणि लो-कार्ब असतो. किर्तीने कधीही फॅन्सी डाएट फॉलो केले नाही. तिच्या फिटनेस प्रवासातून स्पष्ट होते की, स्वतःच्या शरीराचं ऐकणं महत्त्वाचं आहे आणि फिटनेस ही शर्यत नसून आयुष्यभर चालणारा प्रवास आहे.