“प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच…”, जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर लता मंगेशकर झालेल्या भावूक
भारताची गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना १९९५ मध्ये 'स्क्रीन'कडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मुंबईत ५ एप्रिल रोजी होणाऱ्या 'चेतक स्क्रीन अवॉर्डस २०२६'च्या निमित्ताने या सोहळ्यातील आठवणींना उजाळा दिला जात आहे. अभिनेत्री जुही चावलाने लता मंगेशकर यांचा गौरव करताना त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. लता मंगेशकर यांनी पुरस्कार स्वीकारताना आपल्या चाहत्यांचे आभार मानले होते.