माधुरी दीक्षितला अभिनेत्री नाही तर ‘या’ क्षेत्रात घडवायचे होते करिअर
बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षितने एक काळ गाजवला आहे. लहानपणापासून नृत्याची आवड असलेल्या माधुरीने कथकचे प्रशिक्षण घेतले. पुढे बॉलीवूडमध्ये काम करताना माधुरीने जितके अभिनेयातून प्रेक्षकांची मने जिंकली, तितकीच ती तिच्या डान्ससाठी ओळखली गेली. अभिनय, नृत्य आणि तिने साकारलेल्या विविध भूमिका यामुळे माधुरी बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्री ठरली. मात्र माधुरी दीक्षितला अभिनेत्री नाही तर पॅथोलॉजिस्ट व्हायचे होते. तिच्या नशिबात सिनेविश्वात स्वतंत्र्य ओळख निर्माण करणे लिहिले होते.