“मला फक्त अमिताभ बच्चन माहीत होते”, श्रीराम नेने यांनी सांगितला रिसेप्शनचा किस्सा
बॉलीवूड दिग्दर्शिका फराह खान तिच्या मदतणीस दिलीपबरोबर माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या घरी गेली होती. फराहने त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल चर्चा केली. डॉ. नेने यांनी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमधील मजेशीर आठवणी सांगितल्या, जिथे त्यांना अमिताभ बच्चन सोडून इतर कोणतेही सेलिब्रिटी माहीत नव्हते. माधुरीने १९९९ मध्ये डॉ. नेने यांच्याशी लग्न केलं होतं. सध्या माधुरी 'कोण होणार करोडपती' या मराठी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.