वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट; म्हणाली…
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी आज सकाळी वांद्रे, मुंबई येथील इमारतीतून उडी घेऊन आत्महत्या केली. मलायका मुंबईत नसताना ही घटना घडली, ती पुण्यात होती. वडिलांच्या निधनाची बातमी मिळाल्यावर ती दुपारी मुंबईत पोहोचली. वडिलांच्या निधनामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या कठीण काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करा, असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.