Mamta Kulkarni reacts on doing movies after taking sanyas
1 / 31

ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर होण्यासाठी का निवडला किन्नर आखाडा? उत्तर देत म्हणाली…

बॉलीवूड January 26, 2025

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने महाकुंभमेळ्यात किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून संन्यास घेतला आहे. २३ वर्षांच्या तपश्चर्येनंतर तिला हा सन्मान मिळाला आहे. ममता म्हणते की, ती चित्रपटांमध्ये परतण्याची कल्पनाही करू शकत नाही. किन्नर आखाड्याचा भाग होण्याचा निर्णय तिने स्वातंत्र्याचे प्रतिनिधित्व म्हणून घेतला. ममता २५ वर्षांपासून दुबईत राहत होती आणि कुंभ मेळ्यासाठी भारतात येत होती.

Swipe up for next shorts
Narendra Modi
2 / 31

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्याहून परतल्यानंतर दिल्लीत होणार शपथविधी?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४८ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी परवेश वर्मा, विजेंदर गुप्ता, सतीश उपाध्याय, आशिष सूद आणि जितेंद्र महाजन हे प्रमुख दावेदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर शपथविधी होण्याची शक्यता आहे. भाजपाचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री निवडीचा निर्णय घेणार आहे. पक्षाच्या मुख्यालयात पंतप्रधानांनी अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक घेतली.

Swipe up for next shorts
Healthy Lifestyle Tips
3 / 31

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना घ्या ‘या’ ४ गोष्टींची काळजी; अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम

कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन हा सर्वांत सोपा आणि सोईस्कर पर्याय आहे. त्यात अगदी कमी वेळात कपडे धुतलेही जातात आणि सुकूनही निघतात. पण, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना लोक काही वेळा निष्काळजीपणा करतात. त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. जर तुम्हीही वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना 'या' चुका करत असाल, तर त्या आजच थांबवा. कारण- त्या चुकांमुळे कपड्यांमध्ये जीवाणू वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे विविध आजारांचा धोका वाढतो.

Swipe up for next shorts
Success story of megha jain who got business idea while planning for the wedding now owns multi crores business owner of kenny delights
4 / 31

लग्नाची तयारी करताना सुचली कल्पना, आता करतात कोटींची कमाई; कोणता व्यवसाय करते ही व्यक्ती

मेघा जैन ही जयपूरची रहिवासी आहे. २०१२ मध्ये ती स्वत:च्या लग्नाची तयारी करीत असताना तिला व्यवसायाची एक कल्पना सुचली. पाहुण्यांसाठी भेटवस्तू शोधत असताना तिची नजर महागड्या परदेशी सुपरफूड्सवर पडली. त्यामुळे तिला लोकांना असे आरोग्यदायी पदार्थ देण्याची कल्पना सुचली. त्यानंतर तिने स्वतःची कंपनी ‘केनी डिलाइट्स’ सुरू केली. कोरोना साथीच्या काळात लोकांना निरोगी अन्नाची गरज असल्याने तिच्या व्यवसायाच्या वाढीमध्ये भर पडली. आज मेघा एक यशस्वी उद्योजिका आहे.

narendra modi
5 / 31

“भाजपा दिल्ली जिंकली म्हणजे…”, जगभरातील माध्यमांनी काय म्हटलंय?

८ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७० पैकी ४८ जागा जिंकून २७ वर्षांनंतर दिल्लीत सत्ता मिळवली. 'आप'ला २२ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. जागतिक माध्यमांनी भाजपाच्या विजयाला मोठा राजकीय बदल म्हटले आहे. रॉयटर्सने याला मोदींसाठी महत्त्वाचा विजय म्हटले, तर एपीने 'आप'च्या घटत्या लोकप्रियतेवर भाष्य केले. फायनान्शियल टाईम्सने 'आप'च्या अस्तित्वाच्या संकटावर चर्चा केली. अल जझीराने भाजपाच्या सूक्ष्म व्यवस्थापनाचे कौतुक केले. बीबीसीने ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई म्हटली.

AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
6 / 31

‘आप’चा दिल्लीत पराभव, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना धक्का; असे का?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव हा अरविंद केजरीवाल यांच्यासह शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का मानला जातो. भाजपाच्या विजयामुळे महाराष्ट्र भाजपामध्ये आनंदाचे वातावरण आहे. 'आप'चा महाराष्ट्राशी संबंध कमी असला तरी, पवार आणि ठाकरे यांना केजरीवाल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. दिल्लीतील पराभवामुळे महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो.

vicky kaushal
7 / 31

Video: विकी कौशलने पाटणामध्ये घेतला लिट्टी-चोखाचा आस्वाद; व्हिडीओ शेअर करीत म्हणाला…

विकी कौशल(Vicky Kaushal)ची प्रमुख भूमिका असलेला छावा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विकी कौशल मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी अभिनेता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावताना दिसत आहे. आता तो पाटणा येथे गेला होता. त्या वेळचा एक व्हिडीओ अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Bollywood actress Kareena Kapoor shared a cryptic post
8 / 31

“लग्न, घटस्फोट, चिंता अन्…”, करीना कपूरने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली…

बॉलीवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच कठीण परिस्थितींचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वी पती सैफ अली खानवर एका चोराने चाकू हल्ला केला. यामध्ये सैफ अली खान जखमी झाला. या प्रसंगात करीना सैफच्या खंबीरपणे पाठीशी उभी असलेली पाहायला मिळाली. तसंच या घटनेमुळे ती मुलांची अधिक काळजी घेताना दिसत आहे. नुकतीच करीनाने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट केली होती. ज्यामुळे चाहते चिंतेत पडले असून एकच गोंधळ उडाला आहे.

Arushi Nishank cheating case
9 / 31

मुंबईतील दाम्पत्यानं माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीलाच फसवलं; तरुणीला घातला ४ कोटींचा गंडा!

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषी निशंक यांनी मुंबईतील मिनी फिल्म्स प्रा. लि. कंपनीवर फसवणुकीचा आरोप केला आहे. चित्रपटात भूमिका देण्याच्या नावाखाली चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. देहरादून पोलीस ठाण्यात बागला दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिनी फिल्म्सने हे आरोप फेटाळले असून प्रकरण दिवाणी स्वरुपाचे असल्याचे म्हटले आहे.

marathi comedian pranit more says The main accused is still absconding
10 / 31

“मुख्य आरोपी अजूनही फरार”, मारहाण प्रकरणानंतर प्रणित मोरेचा पहिला व्हिडीओ आला समोर

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध मराठी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू, बॉलीवूड अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे प्रणितवर हल्ला केला गेला. याबाबत प्रणितच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. त्यानंतर आता प्रणित मोरेने एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामधून खंत व्यक्त केली आहे.

Junaid khan and Khushi Kapoor starr rom-com Loveyapa box office collection day 2
11 / 31

जुनैद खानच्या ‘लवयापा’ला हिमेश रेशमियाच्या चित्रपटाची टक्कर, दुसऱ्या दिवशीची कमाई फक्त…

आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर चर्चा सुरू आहे. ‘लवयापा’ असं जुनैदच्या नव्या चित्रपटाचं नाव असून यामध्ये तो दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी खुशी कपूरसह प्रमुख भूमिकेत झळकला आहे. ७ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘लवयापा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ गतीने सुरुवात झाली तरी दुसऱ्या दिवशी कमाईत किंचित वाढ झाली आहे. पण, जुनैद खान-खुशी कपूरच्या ‘लवयापा’ला हिमेश रेशमियाचा चित्रपट चांगलीच टक्कर देताना दिसत आहे.

MPSC, UPSC Preparation Tips
12 / 31

१० वी, १२ वीनंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करावी का? सुरुवात कशी करावी? घ्या जाणून

करिअर February 8, 2025

MPSC, UPSC Preparation Tips : १० वी, १२ वी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण- ही दोन वर्षे तुमच्या करिअरला खऱ्या अर्थाने दिशा देणारी असतात. सध्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. पण, तरीही अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळताना दिसतात. पण, त्यासाठी कोणत्या शाखेत प्रवेश घेणे योग्य, परीक्षेसाठी तयारी नेमकी कशी करायची अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ…

Delhi Assembly Election Results 2025
13 / 31

Video: आठवा वेतन आयोग, प्राप्तिकर घोषणा ते न झालेली युती; ‘आप’च्या पराभवाची कारणमीमांसा!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला, तर आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या. काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा एकही जागा मिळाली नाही. गिरीश कुबेर यांच्या मते, काँग्रेस-आप आघाडी न होणे, केजरीवाल यांच्या सभ्यतेचा दिखावा, पायाभूत सुविधांची अपूर्णता, केंद्रीय अर्थसंकल्पातील करमुक्ती आणि आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय हे भाजपाच्या विजयाचे प्रमुख कारण ठरले.

PM Narendra Modi Slams Congress
14 / 31

नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप, “काँग्रेस पक्ष शहरी नक्षलवादाला खतपाणी घालून तोच अजेंडा…”

दिल्लीतील निकालांवर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला नाकारलं आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले की, काँग्रेसला दिल्लीकरांनी कठोर संदेश दिला आहे, सलग सहावेळा पराभव झाला आहे. काँग्रेसवर विश्वास उरलेला नाही, हा पक्ष परजिवी आहे. काँग्रेस सहकारी पक्षांची भाषा, अजेंडा चोरते. काँग्रेसचा अजेंडा शहरी नक्षलवादाचा आहे, त्यामुळे काँग्रेस बरबाद होत आहे.

Narendra Modi Speech on Delhi Assembly Election Results 2025
15 / 31

नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “दिल्लीकरांनी अराजकता, अहंकार आणि ‘आप’दा…”

तप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील भाषणाची सुरुवात "भारत माता की जय" आणि "यमुना मय्या की जय" म्हणत केली. त्यांनी दिल्लीकरांचे आभार मानले आणि भाजपाच्या डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद दिले. मोदींनी दिल्लीच्या विजयाला ऐतिहासिक म्हटले आणि अराजकता, अहंकार आणि आपदा यांचा पराभव झाल्याचे सांगितले. त्यांनी दिल्लीला विकसित भारताची राजधानी बनवण्याचे वचन दिले आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

Delhi Election Results 2025 Vote Margin News
16 / 31

‘आप’साठी दिल्लीत ‘तेराचा फेरा’, काँग्रेसमुळे ‘या’ १३ जागांवर झाला पक्षाचा पराभव!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला, २७ वर्षांची प्रतिक्षा संपवली. आम आदमी पक्षाला अँटि इन्कम्बन्सी आणि काँग्रेसमुळे फटका बसला. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, सोमनाथ भारती यांचा पराभव झाला. काँग्रेसला १३ मतदारसंघांमध्ये भाजपाच्या विजयी मताधिक्यापेक्षा जास्त मतं मिळाली. काँग्रेस-आप आघाडी असती तर भाजपासाठी विजय कठीण झाला असता. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही.

actress Dimple Jhangiani names her daughter Shivona
17 / 31

अभिनेत्री लग्नाच्या ८ वर्षांनी झाली आई, लेकीचं नाव ठेवलं ‘शिवोना’; पती आहे हिरे व्यापारी

'अमृत मंथन' फेम अभिनेत्री डिंपल झांगियानी लग्नानंतर ८ वर्षांनी आई झाली आहे. तिने आपल्या लेकीचं नाव शिवोना ठेवलं आहे, जे भगवान शंकरापासून प्रेरित आहे. डिंपलने डिसेंबर २०१६ मध्ये सनी असरानीशी लग्न केलं होतं. तिने १ फेब्रुवारी २०२५ रोजी आपल्या पहिल्या मुलीचं स्वागत केलं. मातृत्वाचा प्रवास कठीण होता, पण आता ती या नवीन टप्प्यात आनंदी आहे.

Devendra Fadnavis reply to Rahul Gandhi
18 / 31

देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना टोला, “ता उम्र गालिब हम…”

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला आहे. काँग्रेस आणि आपमधील अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत भाजपाने २७ वर्षांनंतर दिल्लीची सत्ता मिळवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाला "एक है तो सेफ है" चे दुसरे उदाहरण म्हटले. राहुल गांधींवर टीका करताना फडणवीस यांनी २०१९ च्या निवडणुकीतील शिवसेनेसोबतच्या चर्चेचा उल्लेख केला, ज्यात अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युलावर वाद झाला होता.

parvesh verma daughter sanidhi
19 / 31

विजयानंतर परवेश वर्मा यांची मुलगी सनिधीची केजरीवाल यांच्यावर टीका; म्हणाली, “कुणी…

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्षाला सत्तेतून पायउतार करत ४८ जागांवर विजय मिळवला आहे. अरविंद केजरीवाल यांचा पराभव भाजप उमेदवार परवेश वर्मा यांनी केला. त्यांच्या मुली सनिधी आणि तृषा यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली. सनिधीने दिल्लीकरांचे आभार मानले तर तृषाने केजरीवाल यांना सत्तेवरून हटवण्याचे वडिलांचे ध्येय स्पष्ट केले.

Navagraha Fame Actor Giri Dinesh Passes Away
20 / 31

पूजा करताना आला हृदयविकाराचा झटका, ४५ वर्षीय अभिनेत्याचं निधन

मनोरंजन February 8, 2025

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिनेश यांचा मुलगा, अभिनेता गिरी दिनेशचे ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'नवग्रह' चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या गिरी दिनेशने शुक्रवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या आकस्मिक निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. गिरी दिनेशने 'बारे नन्ना मुदिना रानी' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती आणि 'नवग्रह' चित्रपटात शेट्टीची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली होती.

PM Narendra Modi
21 / 31

दिल्लीच्या निकालांवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, “विकसित भारताच्या निर्मितीत दिल्ली…”

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने २७ वर्षांनी विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानत दिल्लीच्या विकासाचे आश्वासन दिले. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. अरविंद केजरीवाल यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आणि सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचे आश्वासन दिले. भाजपाला विजय मिळवण्यात आप आणि काँग्रेस यांच्यातील भांडणाचा फायदा झाला.

Amit Shah Reaction
22 / 31

दिल्लीच्या निकालावर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अहंकार आणि अराजकतेचा…”

दिल्ली विधानसभा निवडणुकीत २०२५ मध्ये आम आदमी पक्षाचा पराभव होऊन भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि दिल्लीकरांचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, दिल्लीकरांनी खोटेपणा, भ्रष्टाचार आणि अराजकतेचा पराभव केला आहे. मोदींच्या नेतृत्त्वात दिल्ली एक आदर्श राजधानी बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
23 / 31

दुसऱ्या लग्नानंतर नागा चैतन्य पहिली पत्नी समांथाबद्दल म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”

मनोरंजन February 8, 2025

दाक्षिणात्य स्टार नागा चैतन्य सध्या 'थंडेल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीत त्याने पहिल्या पत्नी समांथा रुथ प्रभूशी झालेल्या घटस्फोटाबद्दल व्यक्त होताना सांगितले की, दोघेही आता आयुष्यात पुढे गेले आहेत आणि एकमेकांचा आदर करतात. नागा चैतन्यने दोन महिन्यांपूर्वी सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. त्याने माध्यमांना प्रायव्हसीचा आदर करण्याचे आवाहन केले.

udit narayan again lip kissed female fan video viral
24 / 31

अरे काय चाललंय? उदित नारायण यांनी पुन्हा चाहतीच्या ओठांचं घेतलं चुंबन; नेटकरी म्हणाले…

बॉलीवूड February 8, 2025

प्रसिद्ध गायक उदित नारायण मागील काही दिवसांपासून त्यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. एका लाइव्ह शोमध्ये महिला चाहत्यांना किस केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली. उदित यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं की, "चाहते प्रेम व्यक्त करतात, याकडे फार लक्ष देऊ नये." मात्र, दुसरा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांना पुन्हा टीकेला सामोरे जावे लागले.

Delhi Winner Candidate List: Check here
25 / 31

दिल्लीचा संपूर्ण निकाल, कोण कुठे जिंकलं? वाचा मतदारसंघनिहाय यादी!

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. आम आदमी पक्ष सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नशील होता, तर भाजपाने २५ वर्षांची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार केला. काँग्रेस आणि आप यांच्यात युती न झाल्याचा भाजपाला फायदा होईल असं मानलं जात होतं. ५ फेब्रुवारीला मतदान झाल्यापासूनच चर्चा सुरू होती.

Arvind Kejriwal
26 / 31

अर्थसंकल्पातील ‘त्या’ घोषणेमुळे दिल्लीत निकाल फिरले? आपला नेमका कशाचा बसला फटका?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहुमताच्या दिशेने वाटचाल केली असून आम आदमी पक्षाचा पराभव होतोय. भाजपाला ४०-४२ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर आपला २८-३० जागांवर राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. भाजपाला ४७.१९% आणि आपला ४३% मते मिळाली आहेत. मध्यमवर्गीयांनी भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे हा फरक निर्माण झाला असल्याचे राजकीय विश्लेषक यशवंत देशमुख यांनी म्हटले आहे.

marathi actor shubham patil bought new car see photos
27 / 31

‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्याने घेतली कार, सांगलीच्या गणपती मंदिरातून फोटो केले पोस्ट

'लाखात एक आमचा दादा' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता शुभम पाटील सध्या चर्चेत आहे. त्याने आपल्या वाढदिवसानिमित्त १३ लाख किमतीची ह्युंदाई क्रेटा कार खरेदी केली आहे. शुभमने सांगलीतील गणपती मंदिरात दर्शन घेतले आणि इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले. चाहत्यांनी त्याला अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. शुभम फिटनेसप्रेमी असून, तो सोशल मीडियावर वर्कआउट व्हिडीओ आणि वैयक्तिक आयुष्याचे अपडेट्स शेअर करतो.

News About Negi
28 / 31

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाकून नमस्कार केलेले रवींद्र सिंह नेगी आघाडीवर की पिछाडीवर?

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटपडगंजचे उमेदवार रवींद्र सिंह नेगी यांना वाकून नमस्कार केला होता, ज्याची चांगलीच चर्चा झाली. नेगी सध्या पटपडगंज मतदारसंघातून आघाडीवर आहेत. नेगी हे विनोद नगरमधून नगरसेवक असून, त्यांच्या वादग्रस्त कृतींमुळे चर्चेत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून डेअरी चालकाला धमकावले होते आणि हिंदू फेरीवाल्यांना भगवा झेंडा लावण्यास सांगितले होते.

Devotees take boat rides at the Sangam during ongoing Mahakumbh Mela, in Prayagraj, Uttar Pradesh, Friday, Feb. 7, 2025.
29 / 31

“महाकुंभमेळा चेंगराचेंगरीत मी आई गमावली, तिच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी…”, मुलाची खंत

महाकुंभ 2025 मध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. बिहारच्या धनंजय कुमार गोंड यांच्या आईचा यात समावेश आहे. धनंजय यांना आईच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी प्रशासन, पोलीस आणि इतर कार्यालयांमध्ये वणवण करावी लागत आहे. प्रमाणपत्र कोण देईल याबाबत स्पष्टता नाही.

amitabh bachchan says time to go
30 / 31

“जाण्याची वेळ झाली…”, अमिताभ बच्चन यांची पोस्ट

महानायक अमिताभ बच्चन गेल्या सहा दशकांपासून सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहेत आणि ८२ वर्षांचे असूनही लोकांचे मनोरंजन करत आहेत. ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. शुक्रवारी रात्री ८.३४ वाजता त्यांनी एक्सवर 'जाण्याची वेळ झाली आहे' अशी पोस्ट केली, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली आहे. ही पोस्ट व्हायरल झाली असून लोक त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

loveyapa box office collection
31 / 31

Loveyapa ची निराशाजनक सुरुवात, जुनैद खान-खुशी कपूरच्या चित्रपटाने कमावले फक्त….

बॉलीवूड February 8, 2025

आमिर खान व खुशी कपूर यांचा 'लवयापा' चित्रपट ७ फेब्रुवारीला रिलीज झाला. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट तमिळ 'लव्ह टुडे'चा रिमेक आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने फक्त दीड कोटींची कमाई केली. प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळाल्याने थिएटर्स रिकामी होती. चित्रपटात जुनैद खान, खुशी कपूर, आशुतोष राणा यांच्यासह अनेक कलाकार आहेत. 'लवयापा'ची कथा गौरव आणि बानी यांच्या प्रेमाभोवती फिरते.