‘धुरंधर’पेक्षा अक्षय खन्नाच्या ‘या’ भूमिकेची फॅन आहे अमृता खानविलकर; म्हणाली…
अमृता खानविलकरने अक्षय खन्नाच्या 'धुरंधर' आणि 'छावा'मधील कामाचं कौतुक केलं आहे. 'धुरंधर' सिनेमातील रहमान डकैतच्या भूमिकेसाठी अक्षय खन्नाचं विशेष कौतुक होत आहे. अमृताने 'छावा'मधील औरंगजेबच्या भूमिकेसाठीही त्याचं कौतुक केलं. 'धुरंधर'ने १२०० कोटींचा टप्पा पार केला असून, त्याचा सीक्वेल 'धुरंधर २' १९ मार्च रोजी रिलीज होणार आहे.