सुपरस्टार्सच्या बालपणीच्या भूमिका केल्या अन् अभिनयक्षेत्र सोडलं, ‘हा’ कलाकार आता काय करतो?
श्रीदेवी आणि रेखा यांसारख्या अनेक अभिनेत्रींप्रमाणेच विशाल देसाई उर्फ 'मास्टर बिट्टू' यांनी बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यांनी 'अमर प्रेम', 'अनोखा बंधन', 'चुपके चुपके' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. नंतर त्यांनी अभिनय सोडून दिग्दर्शनात प्रवेश केला आणि 'बागबान', 'बाबूल', 'भूतनाथ' यांसारख्या चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. सध्या ते टीव्ही क्षेत्रात क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.