“महिलांमुळेच पुरुष आजारी पडतात, एक वेळ हृदयविकाराचा झटका बरा; पण…”, अभिनेत्याचं अजब विधान
एमटीव्हीच्या 'रोडीज' शोमधील परीक्षक रघु राम 'टू गर्ल्स अँड टू कप्स' या पॉडकास्टमधील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने महिलांना पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक आजारांचे कारण ठरवले आहे. रघुच्या मते, पुरुषांना भावना व्यक्त करण्यापेक्षा हृदयविकाराचा झटका सहन करणे सोपे वाटते. त्याच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे. रघुने 'एमटीव्ही रोडीज' आणि 'एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला'मधून करिअरची सुरुवात केली होती.