“मला अमिताभ बच्चन यांची कीव येते, कारण…”; दिग्गज अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत
सुपरस्टार राजेश खन्ना यांची स्टारडम आणि चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ अफाट होती. मात्र, यश टिकवण्यात ते अपयशी ठरले. त्यांच्या अहंकारामुळे करिअरला उतरती कळा लागली. याउलट, अमिताभ बच्चन यांनी यश मिळवूनही जमिनीवर पाय ठेवले. अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी दोघांमधील फरक स्पष्ट केला. अमिताभ नेहमीच शब्द जपून वापरतात आणि प्रतिमा टिकवून ठेवतात, असे मौसमी म्हणाल्या.