मृणाल ठाकूरच्या आईने पूर्ण केली ‘ती’ इच्छा, माय-लेकींचा गोड क्षण; अहिराणी भाषेत म्हणाली…
मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरने बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि चाहत्यांशी संवाद साधते. तिने अलीकडेच तिच्या आईसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिची आई खानदेशी पदार्थ बनवताना दिसते. मृणाल लवकरच 'दो दिवाने सहर मे' या सिनेमातून सिद्धांत चतुर्वेदीसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.