सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे (पश्चिम) येथील घरात मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. दरोडेखोराने मोलकरणीशी वाद घातला, सैफने हस्तक्षेप केल्यावर त्याच्यावर हल्ला झाला. सैफ गंभीर जखमी झाला असून लीलावती रुग्णालयात दाखल आहे. त्याच्या मणक्याजवळ खोल जखमा आहेत. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.