‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या वेळी अनुराग कश्यपने नवाजुद्दीन सिद्दीकीला दिलेला सल्ला; म्हणाला…
अनुराग कश्यप दिग्दर्शित २०१२ मध्ये आलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने फैसल खानची भूमिका साकारली होती. नवाजुद्दीनने 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी अल पचिनोसारखा अभिनय करण्याचा प्रयत्न केला, पण अनुरागने त्याला स्वत:वर विश्वास ठेवून नैसर्गिक अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नवाजुद्दीनने आपली शैली बदलली आणि चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी केली.