Video: वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराला अर्जुन कपूरने दिला धीर, पाहा व्हिडीओ
अभिनेत्री मलायका अरोराचे सावत्र वडील अनिल मेहता यांचे ११ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांनी मुंबईतील वांद्रे येथील इमारतीतून उडी घेत आत्महत्या केली असावी, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेने मलायका व तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर मलायका पुण्यातून परत आली. अर्जुन कपूर दिवसभर तिच्या सोबत होता. मलायकाने वडिलांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.