Video: लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच दिसली दीपिका पादुकोण, दिलजीत दोसांझ म्हणाला…
लोकप्रिय गायक दिलजीत दोसांझच्या बंगळुरूतील कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणने हजेरी लावली. आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दीपिका सार्वजनिक ठिकाणी दिसली. दिलजीतने दीपिकाला स्टेजवर बोलावून चाहत्यांना सरप्राईज दिलं. दीपिका मंचावर थिरकली आणि चाहत्यांशी संवाद साधला. दिलजीतने तिचं कौतुक करताना तिच्या कामाचं आणि स्वबळावर बॉलीवूडमध्ये स्थान निर्माण केल्याचं म्हटलं. दीपिकाच्या कॉन्सर्टमधील व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत.