“मी बिअरसारखी घोट-घोट…”, लघवी प्यायल्याने जखम बरी झाल्याचा परेश रावल यांचा दावा
परेश रावल यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, ‘घातक’ चित्रपटाच्या सेटवर जखमी झाल्यानंतर त्यांनी अजय देवगणच्या वडिलांच्या सल्ल्याने लघवी प्यायली. वीरू देवगण यांनी सकाळी उठून लघवी पिण्याचा सल्ला दिला होता. परेश रावल यांनी १५ दिवस लघवी पिल्यानंतर त्यांच्या दुखापतीत सुधारणा झाली. डॉक्टरांनीही त्यांच्या जलद बरे होण्यावर आश्चर्य व्यक्त केलं.