सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा ‘असा’ शिरला घरात
अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरी दरोड्याचा प्रयत्न झाला. चोरट्याने मदतनीसच्या खोलीत शिरून तिचा आरडाओरडा ऐकून सैफ तिथे पोहोचला. चोरट्याने सैफवर चाकूने हल्ला केला, ज्यात सैफ जखमी झाला. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून तपास सुरू आहे.