“माझे अर्धे आयुष्य त्यांची वाट पाहण्यात गेलं”, शत्रुघ्न सिन्हांबद्दल अभिनेत्रीचं विधान
७०-८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या अभिनयाबरोबरच उशिरा येण्याच्या सवयीमुळे चर्चेत होते. सहकलाकार पूनम ढिल्लन यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितले की, त्यांनी अर्ध आयुष्य शत्रुघ्न सिन्हांची वाट पाहण्यात घालवले. ते सकाळी ९ वाजताच्या शिफ्टसाठी संध्याकाळी ४ वाजता यायचे. चंकी पांडे यांनीही उशिरा येण्याच्या सवयीबद्दल खुलासा केला होता. शिवाय अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या उशिरा येण्याच्या सवयीबद्दलचा एक किस्सा सांगितला होता.