पूनम पांडे गरोदर? ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण; मराठी अभिनेता कमेंट करत म्हणाला…
पूनम पांडेने इन्स्टाग्रामवर बेबी बंप दाखवणारे फोटो शेअर करत गरोदर असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, नेटकऱ्यांना तिच्या या घोषणेवर विश्वास बसत नाहीये. काहींनी हे फोटो 'एआय' निर्मित असल्याचा संशय व्यक्त केला आहे, तर काहींनी हा 'एप्रिल फूल'चा प्रकार असावा असं म्हटलं आहे. २०२४ मध्ये पूनमने खोटी कर्करोगाची बातमी पसरवली होती, त्यामुळे तिच्या गरोदरपणाच्या बातमीवरही लोक सहजासहजी विश्वास ठेवायला तयार नाहीत.