“मी त्याला सतत चित्रपटांबद्दल विचारतो…”, रणवीर सिंहचं सासऱ्यांबरोबर आहे घट्ट नातं
रणवीर सिंहच्या 'धुरंधर' आणि 'धुरंधर २' या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळालं. दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चित्रपटातील अभिनयाचं कौतुक केलं, पण हिंसा जास्त असल्याचं म्हटलं. त्यांनी रणवीरबरोबरच्या नात्याबद्दल आणि दोन्ही कुटुंबातील जवळीकीबद्दलही सांगितलं. तसेच, दीपिका आणि रणवीरच्या लेकीच्या संगोपनात दीपिकाचं योगदान अधिक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.