बब्बर कुटुंबाला लग्नात न बोलावण्याबद्दल प्रतीक बब्बरच्या बायकोने सोडलं मौन, म्हणाली…
अभिनेता प्रतीक बब्बरने व्हॅलेंटाईन डेला (१४ फेब्रुवारी २०२५) प्रिया बॅनर्जीबरोबर दुसरं लग्न केलं. हे लग्न त्याच्या दिवंगत आई स्मिता पाटील यांच्या मुंबईतील घरात झालं. प्रिया बॅनर्जीचे कुटुंबीय आणि स्मिता पाटील यांच्या माहेरची मंडळी उपस्थित होती, मात्र बब्बर कुटुंबाला निमंत्रण नव्हतं. प्रतीकच्या सावत्र भावाने नाराजी व्यक्त केली. प्रिया बॅनर्जीने लग्नात बब्बर कुटुंबाला न बोलावण्याबद्दल स्पष्टीकरण दिलं.