मैत्री असावी तर अशी! प्रेम चोप्रा आजारी असताना अमिताभ बच्चन रोज करायचे ‘ही’ एक गोष्ट
ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते बरे झाले. त्यांच्या प्रकृतीविषयी समजताच अमिताभ बच्चन यांनी दररोज 'लवकर बरे व्हा' असा मेसेज पाठवला. प्रेम चोप्रा यांनी १९७०-८० च्या दशकात अमिताभ बच्चनसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रेम चोप्रा यांनी ६ दशकांमध्ये ३८० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले आहे.