‘धुरंधर २’मधील सीनमुळे आर. माधवनविरुद्ध पोलिसांत तक्रार; अभिनेता स्पष्टीकरण देत म्हणाला…
आर. माधवन अभिनीत 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटातील एका सीनमुळे शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या सीनमध्ये गुरु गोबिंद सिंगजी यांच्या दशम ग्रंथातील ओळी म्हणताना माधवन सिगारेट ओढत असल्याचा गैरसमज झाला. माधवनने व्हिडीओद्वारे स्पष्ट केले की, सिगारेट आधीच विझवली होती आणि कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तरीही, कुणी दुखावले असल्यास त्यांनी माफी मागितली आहे.