अमिताभ बच्चन यांनी ६४ व्या वर्षी कसं फेडलेलं ९० कोटींचं कर्ज? रजनीकांत म्हणालेले…
अमिताभ बच्चन हे प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांच्यावर जवळपास ९० कोटी रुपयांचं कर्ज झाले होते. अमिताभ यांच्या जिद्दीचं कौतुक करताना रजनीकांत म्हणाले, “ती व्यक्ती सातत्यानं जाहिरात करीत असल्यानं मुंबईच्या चित्रपटसृष्टीतील त्यांचा द्वेष करणारे लोक त्यांना हसू लागले. पैशांसाठी हे सगळं करत असल्याचे म्हणत हिणवू लागले. पैशांसाठी जाहिरात करीत असल्याचे ते म्हणत होते. तीन वर्षं, अनेक आरोग्यविषयक समस्या असूनही त्यांनी दिवसाचे १८ तास काम केले आणि आपली सर्व देणी फेडली."