रजनीकांत यांना मागावी लागली होती अमरीश पुरींची माफी; निधनाच्या २१ वर्षांनंतर मुलाचा खुलासा
राजीव यांनी रजनीकांत यांच्याबरोबर अमरीश पुरी यांचा घडलेला एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, "अमरीश पुरी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी चेन्नईला गेले होते. तो सिनेमा रजनीकांत यांच्याबरोबर होता. मात्र, त्यावेळी रजनीकांत खूप मोठेपणा मिरवत असल्याचं डॅडींना वाटलं होतं. म्हणून त्यांनी निर्मात्यांना सिनेमामध्ये काम करण्यास नकार कळवला आणि रजनीकांतबरोबर काम करण्यास सोयीचं वाटत नसल्याचं निर्मात्यांना सांगून टाकलं. यानंतर रजनीकांत यांनी अमरीश पुरी यांची माफी मागितली होती आणि त्यानंतर त्यांनी एकत्र काम केलं."