रणबीर कपूरने ‘रामायण’साठी मांसाहार सोडल्याचा दावा खोटा? व्हायरल व्हिडीओमुळे होतोय ट्रोल
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर 'रामायण' सिनेमात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे. त्याने या भूमिकेसाठी मांसाहार सोडल्याचा दावा केला होता. मात्र, नेटफ्लिक्सच्या 'डायनिंग विथ द कपूर्स' शोमध्ये मांसाहार करताना दिसल्यामुळे सोशल मीडियावर टीका होत आहे. ट्रोलर्सनी त्याच्या पीआर टीमवरही टीका केली आहे. 'रामायण' सिनेमा डिसेंबर २०२४ मध्ये रिलीज होणार असून, दुसरा भाग २०२७ मध्ये येईल.