‘रामायण’मधील प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरलाच का निवडलं? दिग्दर्शक म्हणाले..
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'रामायण' चित्रपटाचा टीझर हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रदर्शित झाला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. रणबीरने आधी ही भूमिका नाकारली होती, पण नंतर बाबा झाल्यानंतर त्याने होकार दिला. 'रामायण' चित्रपट दोन भागांत येणार असून, पहिला भाग दिवाळीत आणि दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होईल.