२ महिन्यांनंतरही ‘धुरंधर’चं तिकीटबारीवर वर्चस्व, ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला भारतीय चित्रपट
रणवीर सिंहच्या मुख्य भूमिकेत असलेल्या आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने BookMyShow वर सर्वाधिक काळ ट्रेंड होण्याचा विक्रम केला आहे. जागतिक स्तरावर १,३५० कोटींची कमाई करणारा हा सिनेमा ओटीटीवरही हिट ठरला. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा सिक्वेल १९ मार्च रोजी रिलीज होणार आहे.