‘धुरंधर २’च्या सेटवर रणवीर सिंहला झालेली गंभीर दुखापत, सहकलाकाराने सांगितला थरारक प्रसंग
'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाच्या सेटवर रणवीर सिंह जखमी झाला. अमृतसरमध्ये अॅक्शन सीन शूट करताना गुरसेवक सिंहच्या चुकांमुळे रणवीर त्याच्या अंगावर कोसळला, ज्यामुळे दोघेही जखमी झाले. गुरसेवकने रणवीरची माफी मागितली, पण रणवीरने त्याला धीर दिला. या घटनेनंतरही रणवीरने गुरसेवकला कधीही दोष दिला नाही. गुरसेवकने रणवीरच्या माणुसकीचे आणि प्रेमाचे कौतुक केले.